Ad will apear here
Next
डॉ. योगेश उपाध्याय ‘एफआयटीएस’च्या अध्यक्षपदी
डॉ. योगेश उपाध्याय
पुणे: व्यावसायिक प्रशिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेनर्स अँड स्पीकर्स’ (एफआयटीएस) या संस्थेच्या अध्यक्षपदी पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’मधील (एआरएआय) डॉ. योगेश उपाध्याय यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. उपाध्याय एआरएआयमधील ‘एचइएम अँड ए’ विभागाचे उपसरव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

‘एफआयटीएस’च्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पुण्यात घेण्यात आली. या वेळी डॉ. योगेश उपाध्याय यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड होणारे डॉ. उपाध्याय हे पहिलेच भारतीय ठरले आहेत.

यापूर्वी जॉर्डन येथील डॉ. युनुस खात्याबेह या संस्थेच्या अध्यक्षपदी होते. या निवडणुकीत सुदानचे डॉ. खालिद बिन अली ओमार हे संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.‘एफआयटीएस’मध्ये वेगवेगळ्या देशांमधील प्रशिक्षक, वक्ते आणि या क्षेत्रातील सल्लागारांचा समावेश आहे. संस्थेच्या महासचिवपदी डॉ. सेनान शेगदेह (यूएसए), प्रमाणीकरण संचालक या पदी डॉ. ए. बी. दादास (भारत), तर, संचालक मंडळात डेव्हिड चाड्रॉन (यूएसए), डॉ. जिदापा (थायलंड), डॉ. मुशर्रफ हुसेन (बांग्लादेश), डॉ. अलशोका जिंदासा (श्रीलंका), डॉ. खोदेर मेहलेम (लेबनन), डॉ. घॅसन ओवेसिस (जॉर्डन), डॉ. सुनंता लाओहानान (थायलंड), डॉ. अजहर कासीम यांचा समावेश आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZTPBM
Similar Posts
‘एआरएआय’ आणि ‘एनसीएल’मध्ये सामंजस्य करार पुणे : इलेक्ट्रिक मोबिलिटी असलेल्या वाहनांची संख्या वाढविणे ही आज काळाची गरज आहे. भविष्यात या इलेक्ट्रिक गाड्यांमधील बॅटरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असणार आहे. त्यामुळे वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या योग्य बॅटरी विकसित करत त्याचे एकत्रित संशोधन गतिमान करण्याच्या उद्देशाने दी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ
‘एआरएआय’मध्ये पर्यावरण संशोधन प्रयोगशाळा पुणे: ‘दि ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (एआरएआय) नवीन पर्यावरण संशोधन प्रयोगशाळा व ‘व्हर्च्युअल कॅलिब्रेशन सेंटर’चे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले.
एआयएस-१४० आधारित टेलिमॅटिक्स प्रणाली सादर पुणे : केपीआयटीतर्फे भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २८ नोव्हेंबर २०१६च्या सूचनेला अनुसरून, भारतातील पहिल्या एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) प्रमाणित एआयएस (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड)- १४० वर आधारित, व्हेइकल टेलिमॅटिक्स आणि इर्मजन्सी बटन सोल्युशन्स उपलब्ध करून
‘वाहन उद्योगाच्या हिताला बाधा आणणार नाही’ पुणे : ‘केंद्र सरकार आपली उद्योगविषयक धोरणे ठरवताना देशातील वाहन उद्योगाच्या हिताला बाधा येणार नाही याची खबरदारी घेईल,’ असे आश्वासन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिले. ‘सिम्पोझिअम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी २०१९’ या वाहन तंत्रज्ञान विषयक जागतिक परिषदेच्या समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language